डिजीटल फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी मोबाईलचा जागरूकपणे वापर करावा : रुपाली घाटगे

<p>डिजीटल फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी मोबाईलचा जागरूकपणे वापर करावा : रुपाली घाटगे</p>

कोल्हापूर – शहरातील भवानी मंडप येथे  आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी पुरवठा विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन झाल्या असून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या रुपाली घाटगे यांनी, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना सहा मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांनी निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन केले. २०१९ च्या नव्या कायद्यामुळे ग्राहक न्यायालयांचे अधिकार वाढले असून ग्राहकांना अधिक न्याय मिळत आहे. ग्राहकांनी वैद्यकीय तसेच डिजिटल व्यवहारांबाबत जागरूक राहावे तसेच अन्याय झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही घाटगे यांनी केले. यावेळी कृषी, महावितरण, बँका, राज्य परिवहन, गॅस कंपनी, बीएसएनएलसह विविध शासकीय विभागांचे माहिती देणारे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते.

यावेळी एकल प्लास्टिक वापरणार नाही, अशी शपथ उपस्थितांनी घेतली. कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोकरे, अन्न धान्य वितरण अधिकारी सचिन काळे, बीएसएनएलचे अधिकारी, ग्राहक, रेशन दुकानदार आणि विविध ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.