‘या’ तारखेपासून सुरु होणार तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला

<p>‘या’ तारखेपासून सुरु होणार तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला</p>

कोल्हापूर -  ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यावतीने तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा व्याख्यानमालेचे  रौप्य महोत्सवी वर्ष असून यामध्ये सात दिवसीय व्याख्यानमालेसह धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचं विकसित भारत २०४७ या विषयावर , २९ नोव्हेंबरला संजय दाबके यांचं संग्रहालय आणि थीम पॉवर्सचे अनोखे जग या विषयावर व्याख्यान होणार आहे,  ३० नोव्हेंबरला आत्माराम परब यांची ऑफ बीट पर्यटनाला नवी दिशा देणारा छंदी उद्योगी प्रकट मुलाखत, १ डिसेंबरला ए आय क्रांती आणि सायबर सुरेक्षेचे  भविष्य यावर डॉक्टर अमय पांगारकर यांची प्रकट मुलाखत,  २ डिसेंबरला मनमौजी गप्पा आणि कविता या विषयावर वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत, ३ डिसेंबरला कौशल इनामदार यांचे गेल्या शतकातील मराठी संगीताची वाटचाल या विषयावर व्याख्यान, ४ डिसेंबरला डॉक्टर धनश्री लेले यांचे कृष्ण समजावून घेताना या विषयावर व्याख्यान, अशी सलग सात दिवस विविध व्याख्याने  होणार आहेत. ही सर्व व्याख्याने विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.