“ओबीसींनी एकता राखून राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क शाबूत ठेवावा” – शिवाजी माळकर
बीड शेड : ओबीसी समाजावर अन्याय होत असून भारतीय राज्यघटनेने दिलेले राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसींनी एकत्र येऊन मतपेटीतून लढा उभारावा, असे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी बीड शेड येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात केले. “मागासवर्गीयांची मते मागासवर्गीय उमेदवारांनाच. ‘वोट हमारा – राज तुम्हारा, नहीं चलेगा’ हा नारा गावोगाव पोहोचवा,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी, ओबीसी नेतृत्व उभारण्यासाठी न घाबरता राजकारणात पुढे येण्याचे आवाहन केले. राज्य सचिव सयाजी झुंजार यांनी जातीघरात ठेवून बाहेर ओबीसी म्हणून एकत्र येण्याचे प्रतिपादन केले. युवानेते सद्दाम मुजावर, सचिन सुतार, संजय सुतार, सौ. मनिषा गुरव आणि सौ. सारीका सुतार यांनीही ओबीसींच्या हक्क, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्वाविषयी मार्गदर्शन केले.
मेळाव्यात सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी पंडित परीट, काशिनाथ माळी, जोतिराम लोहार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.