मोकळ्या ठिकाणी कुत्र्यांना खायला घालताय मग थांबा...!
अन्यथा दंडात्मक कारवाई होणार...
मुंबई – राज्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे लहान मुले, नागरिकांवर कुत्रे हल्ले करत आहेत. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाने, ‘मोकळ्या ठिकाणी खायला देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा’ आदेश काढला आहे. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी आता कुत्र्यांना खायला घालता येणार नाही.
राज्य शासनाने सर्व महापालिका/नगरपालिका/नगर पंचायतींनी प्रत्येक नागरी भागात कुत्र्यांना पकडण्यासाठी नियमित मोहीम, त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य केले आहे. तसेच ज्या भागात कुत्र्यांचे पुनर्वसन किंवा सोडले जाईल तेथील संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांच्या खाण्याच्या जागा निश्चित करून त्याच ठिकाणी खायला देण्यात यावे. याची खातरजमा करण्यात यावी असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.