‘या’ गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या सापडला...
बिबट्याला ठार मारण्यासाठी गावकरी आक्रमक
पुणे - पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलंत दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा जीव घेतला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बिबट्याच्या दहशतीमुळे वनविभागाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार शोधमोहीम सुरु करण्यात आली आणि अखेर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला.
बिबट्या सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बिबट्याकडे धाव घेतली असून गावकरी आता आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी त्या बिबट्याला ठार मारण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु मंत्रालयात यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर निर्णय घेवू असे गावकऱ्यांना सांगण्यात आले आहे त्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या बिबट्या जेरबंद झालेला परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरता पुढचा तणाव टळला आहे.