भटक्या कुत्र्यांना शासकीय कार्यालय परिसरात खायला घालण्यावर आता येणार निर्बंध...
कोल्हापूर - भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने २२ ऑगस्ट च्या आदेशानंतरही अनुपालन शपथपत्रे का दाखल केली नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी मुख्य सचिवांना आजच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने याची नोंद घेतली. याप्रश्नी राज्यांनी शपथपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे खंडपीठाने पुढील तारखांना मुख्य सचिवांच्या वैयक्तिक उपस्थितीला स्थगिती दिली. तसेच भविष्यात काही चूक झाल्यास आदेश देण्याचा इशारा खंडपीठाने दिला.
सरकारी कार्यालयांच्या इमारतींच्या परिसरात भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावर नियमनासाठी निर्देश जारी केला जाईल. हा आदेश काही दिवसांत वेबसाईटवर अपलोड केला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे, अशी विनंती वरिष्ठ वकील करूणा नंदी यांनी केली, मात्र सरकारी कार्यालयांबाबत आम्ही ऐकणार नाही, असे स्प्ष्ट करत पुढील सुनावणीवेळी हा मुद्दा तपासला जाईल असे खंडपीठाने सांगितले आहे.