कोल्हापूरचं नांव उज्ज्वल करणाऱ्या कोल्हापूरकरांचा सन्मान
'ब्रँड कोल्हापूर' संकल्पनेतून आता खेळाडूंना बळ मिळणार

कोल्हापूर - काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या ६ वर्षापासून कोल्हापुरातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकिक जागतिक पातळीवर करणाऱ्या कोल्हापूरकरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात येतं. आज शनिवारी हॉटेल सयाजी मध्ये यंदाचा ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा संपन्न झाला. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. संयोजन समिती सदस्य भरत दैनी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून स्वागत करण्यात आलं. यावेळी संयोजन समिती सदस्य पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. यशवंतराव थोरात यांचा अल्प परिचय करून दिला. तर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळोखे यांचा अल्प परिचय प्राचार्य अजेय दळवी, पत्रकार अनुराधा कदम यांनी करून दिला. यानंतर डॉ. यशवंतराव थोरात आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते डॉ सुरेश शिपुरकर आणि शैलजा साळोखे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत, ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसाळे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहिती पटांचे निर्मात दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी, आयपीएस परीक्षेतील यशवंत बिरदेव डोणे यांच्यासह विविध क्षेत्रात कोल्हापूरचा लौकिक वाढवणारे सौरभ पाटील, हेमराज पनोरेकर, दिलीप देसाई, आदिती चौगुले,मयूर कुलकर्णी, प्रशांत बिडकर, यांच्यासह अन्य मान्यवरांना कोल्हापूरकरांना बँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बँड कोल्हापूर संयोजन समितीच्या वतीनं दानशूर व्यक्ती संस्थांकडून निधी संकलित करावा असं आवाहन करत स्वतः एक लाख रुपयांचा निधी जाहीर केला. बाईट डॉ. यशवंतराव थोरात.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सुध्दा डॉ. यशवंतराव थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेळाडूंसाठीच्या निधी संकलनासाठी पाच लाख रुपयांचं योगदान देणार असल्याचं जाहीर केलं. आपल्या गावातील लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे, पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे न्यावेत यासाठी बँड कोल्हापूर हा उपक्रम सुरू केला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.