यंदाचा बळीराजा सन्मान "पुरस्कार संजय गुदगे, सुरेश चौगले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर

<p>यंदाचा बळीराजा सन्मान "पुरस्कार संजय गुदगे, सुरेश चौगले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर</p>

कोल्हापूर - बळीराजा महोत्सव समितीच्यावतीनं दरवर्षी सामाजिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. त्यानुसार यंदाचा बळीराजा सन्मान पुरस्कार संजय गुदगे, सुरेश चौगले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर झालाय २५ ऑक्टोबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा होणारय. असंघटीत क्षेत्रातील कामगारांचं संघटन करत जिल्ह्यातील हजारो लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्या बद्दल संजय गुदगे यांना, राष्ट्रसेवा दल, जोडीदाराची विवेकी निवड, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, संविधान संवाद समिती या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल रेश्मा खाडे यांना तर राष्ट्रसेवा दलासह समाजवादी चळवळीतील योगदाना बद्दल सुरेश भीमाप्पा चौगले यांना बळीराजा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणारय. यावर्षीचा बळीराजा महोत्सव बिंदू चौकात संपन्न होणारय. सकाळी दहा वाजता बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करत यावेळी दिवाळी कशी साजरी करावी या पत्राचं वाटप करण्यात येणारय. जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावं असं आवाहन बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलंय.

या पत्रकार बैठकीला बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पोवार, सचिव दिगंबर लोहार, खजानिस रवी जाधव, मार्गदर्शक डॉ टी. एस. पाटील, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भाई बाबुराव कदम, संभाजी जगदाळे, बाबाराजे महाडिक, महेश जाधव, शफीक देसाई, किरण गवळी, पंकज पाटील, सचिन घोरपडे, आनंदराव चौगले, ओंकार नलवडे, अनिकेत सावंत, पंकज खोत, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.