दीपावली स्वच्छतेसाठी विशेष मोहीम – 150 टन कचरा उठाव

कोल्हापूर - दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवली. ही मोहीम 17 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता सुरू होऊन पहाटे 5 वाजेपर्यंत चालली.
या मोहिमेदरम्यान १५० टन कचरा आणि झाडांची कटिंग्स शहरातून उचलण्यात आली. या कामासाठी महापालिकेच्या वतीने ५ जेसीबी, ५ डंपर आणि ५ ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने एकूण १५ खेपा करण्यात आल्या.
ही स्वच्छता मोहीम :
▶️ टाकळा मेन रोड
▶️ आणूकामिनीका मंदिर परिसर
▶️ शिवाजी हाउसिंग सोसायटी
▶️ राजारामपुरी (११वी ते १३वी गल्ली)
▶️ हॉकी स्टेडियम
▶️ साने गुरुजी वसाहत
▶️ कावळा नाका
▶️ रुईकर कॉलनी
▶️ राजेश मोटर्स मागील भाग
▶️ वायचळ रोड, ठाकूर घरासमोर
▶️ गव्हर्नमेंट प्रेस, डॉ. कोरे यांचे समोर
▶️ प्रतापसिंहराव चव्हाण गार्डन
▶️ खर्डेकर गार्डन
▶️ डॉ. जयंत वाटवे घराजवळ
▶️ सर्किट हाऊस
▶️ अष्टेकर नगर
▶️ रमणमळा, महावीर कॉलेज–न्यू पॅलेस रोड
▶️ दत्त मंदिर (न्यू पॅलेस) या ठिकाणी राबविण्यात आली
या उपक्रमामध्ये 10 डंपर व 08 ट्रॅक्टर खेपांद्वारे शहर स्वच्छ करण्यात आले. स्वच्छतेच्या या विशेष मोहिमेमुळे दीपावली सणानिमित्त शहरातील रस्ते, गल्ली व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व आकर्षक बनली असून, आरोग्य विभागाने रात्रपाळीमध्ये हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले.
ही मोहीम प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपयुक्त पारितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.