राज्यातील ‘या’ शहरात धावली पहिली हायड्रोजन बस

पुणे – शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात राज्यातील पहिली हायड्रोजन बस धावली आहे. या बसचे ट्रायल रन काल बुधवारी पुण्यातील औंध येथील मेडाच्या कार्यालयात झाले. मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून पुन्हा मेडा कार्यालय अशी ट्रायल रन घेण्यात आली. या यशस्वी ट्रायल रनमुळे ही बस आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात लवकरच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.