दीपावलीसाठी खाजगी बसेसची विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांकडून जादा भाडे घेतल्यास थेट कारवाई

<p>दीपावलीसाठी खाजगी बसेसची विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांकडून जादा भाडे घेतल्यास थेट कारवाई</p>

कोल्हापूर - दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) कोल्हापूर यांच्यावतीने खाजगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम १० ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

➡️तपासणीचे प्रमुख मुद्दे -
▪️विना परवाना/परवाना अटींचा भंग करून वाहन चालवणे
▪️टप्पा वाहतूक व अवैधरित्या मालवाहतूक
▪️योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने
▪️बेकायदेशीर फेरबदल व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
▪️मोटार वाहन कर भरलेला आहे की नाही याची तपासणी
▪️सुरक्षा उपकरणांची स्थिती (परावर्तीका, इंडिकेटर, टेललाईट, वायपर)
▪️आपत्कालीन निर्गमन दरवाजे व अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहेत का हे तपासणे
▪️जादा भाडे आकारणी होत आहे का याची खातरजमा

➡️जादा भाडे = थेट कारवाई...!
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट केले की, शासननिर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

➡️तक्रार कशी करावी?...
दीपावलीच्या प्रवासात जर जादा भाडे मागितले गेले, वाहन असुरक्षित वाटले किंवा शंका वाटल्यास, घाबरू नका. प्रवाशांनी खालील माध्यमातून तक्रार नोंदवा... असं आवाहन केलंय.
व्हॉट्सअॅसप क्रमांक : ९४२३०१२१३४
ई-मेल : rtokolhapur.khatala@gmail.com