चंदगड तालुक्याच्या आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव पुरस्कारात ‘झांबरे’ जिल्ह्यात प्रथम

<p>चंदगड तालुक्याच्या आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव पुरस्कारात ‘झांबरे’ जिल्ह्यात प्रथम</p>

चंदगड - आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव 2023-24 या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातील झांबरे गावाने जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. या यशस्वी कामगिरीबद्दल गावाला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस. यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.