तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी आढावा बैठक — आरोग्य सेवांबाबत नाराजी, अंमलबजावणीसाठी मागणी

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी, मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि आगामी कामांबाबत चर्चा झाली.
☑️बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि निर्णय:
➡️११ जून २०२५ रोजी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याची तक्रार यावेळी उपस्थित सदस्यांनी केली.
➡️आरोग्य सेवा संदर्भात नाराजी: नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या मार्गदर्शनानुसार तृतीयपंथीयांना मिळणाऱ्या ५३ सेवा अद्याप प्रभावीपणे लागू करण्यात आलेल्या नाहीत, यावरून मंडळाच्या सहअध्यक्षा शिवानी गजबर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ अंमलबजावणीची मागणी केली.
☑️सकारात्मक पावलं:
➡️वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने काही महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यात आल्या असून, त्यात:
➡️ तृतीयपंथीयांसाठी एचआरटी (Hormone Replacement Therapy) मोफत उपलब्ध करून देणे
➡️स्वतंत्र स्वच्छतागृह,
➡️स्वतंत्र केसपेपरची रांग,
➡️स्वतंत्र रुग्णखाटांची व्यवस्था
यासारख्या सुविधांचा समावेश आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात आलं.
या बैठकीस तृतीयपंथी मंडळाच्या सह उपाध्यक्षा सान्वी जेठवाणी, सदस्य ऍड. पवन यादव, मयुरी आळवेकर, योगा नंबियार, राणी ढवळे, पार्वती जोगी, सलमा खान आदी उपस्थित होते