नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

<p>नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम</p>

कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर १ एप्रिलला चैत्र यात्रा संपन्न झाली. यात्रेला ८ ते ९ लाख भाविक आले होते. या यात्रा काळात जोतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात घन कचरा साचला होता. त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

डोंगरावरील पायरी मार्ग, बस स्थानक परिसर, सेंट्रल प्लाझा, मेन पार्किंग, दर्शन रांग, जोतिबा आणि यमाई मंदिर परिसर, भक्त निवास आणि अन्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानचे पंधराशेहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. एकूण पन्नास ते साठ ट्रॉली घनकचरा एकत्रित करण्यात आल्याचे प्रतिष्ठानच्या स्वयंसेविका वासंती पाटील यांनी सांगितले. स्वयं सेवकांबरोबरच गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पोवार, ग्रामपंचायत कर्मचारी, पुजारी आणि ग्रामस्थही या मोहिमेत सहभागी झाले होते.