श्री अंबाबाई मंदिर परिसरातील हेरिटेज लूकचा म्युझिकल पोल काही दिवसांपासून बंद 

<p>श्री अंबाबाई मंदिर परिसरातील हेरिटेज लूकचा म्युझिकल पोल काही दिवसांपासून बंद </p>

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिर परिसरात २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वापरून म्युझिकल पोल उभारण्यात आले होते. त्यामुळे परिसर उजळून निघाला आणि दिवसभर भक्तिगीतेत चैतन्य निर्माण होत होतं. मात्र, कित्येक दिवसांपासून हे म्युझिकल पोल बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांतून संतप्त भावना उमटल्या होत्या. यासंदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून म्युझिकल पोलबाबत आढावा घेतला. पोल बंद का? मैटेनन्स का करत नाही? आम्ही केलेल्या विकासकामात खोडा घालून पोल बंद पाडले जातायत काय? असा जाब विचारत तत्काळ पोलमधून श्री अंबाबाई आरतीसह इतर भक्तिगीते सुरू करण्याचे आदेश दिले. तसंच मंदिराच सुशोभिकरण हे आमच्या प्रयत्नांनी केलंय, पण पोल्सच्या देखभालीसाठी राखीव निधीतून अभियंत्यांची नियुक्ती करावी आणि आवश्यक यंत्रसामुग्री ठेकेदारांकडून उपलब्ध करावी. विकासकामांसाठी निधी आम्ही आणतो, पण त्याची योग्य देखभाल ही महापालिका आणि देवस्थान समितीची जबाबदारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रमाकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, विद्युत विभागाचे दळवी यांच्यासह अधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.