के.एम.टी.चा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या के.एम.टी. उपक्रमाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त के.एम.टी.च्या शास्त्रीनगर मधील यंत्रशाळेमध्ये महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी के. एम.टी. उपक्रमाचे संस्थापक स्व. श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
यावेळी परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव, आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक के. मंजूलक्ष्मी यांनी के.एम.टी. कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कदमवाडीतील सुसंस्कार हायस्कूल विद्यार्थ्यांनी झांजपथकाचं सादरीकरण केलं. याप्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, उप सभापती दिपा ठाणेकर, यांच्यासह परिवहन समिती सदस्य तसंच जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार आदि उपस्थित होते