१४ आणि १५ जानेवारीला सर्व मार्गावरील के एम टी बससेवेत कपात
कोल्हापूर - महानगरपालिका निवडणूकीसाठी मतदान साहित्य व कर्मचारी वर्ग मतदान केंद्रावर पोहोचवणे व परत आणणे अशा आवश्यक कामगिरीसाठी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दि.14/01/2026 रोजी सकाळ पासून दुपारी 4.00 वा.पर्यन्त व दि.15/01/2026 रोजी दुपारी 2.00 वाजले. नंतर सर्व मार्गावरील बसेसच्या सर्वच फेऱ्यामध्ये कपात केली जाणार आहे.
14 ते 15 जानेवारी या कालावधीत रद्द होणाऱ्या फेऱ्यांचा विचार करुन सर्व प्रवासी नागरीकांनी रु.40/- चा एक दिवसीय पास खरेदी करताना आपली गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच एक दिवसीय पास खरेदी करावा. तसेच सर्व प्रवाशांनी वर नमूद तारखांना उपलब्ध होणाऱ्या बससेवेद्वारे प्रवास करुन होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.