22 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका...
23 February 2025, 12:17:23 PM
Share
नवी दिल्ली – 22 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानने सुटका केली आहे. 2021 - 2022 दरम्यान पाकिस्तानच्या समुद्र सीमेमध्ये मासेमारी केल्याबद्दल 22 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. या मच्छीमारांना अटारी-वाघा सीमेवर पोहचण्यात आले आहे. तसेच यातील काही मच्छीमारी करणारे गुजरात, दीव आणि उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळतीय.