घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी केली अटक
06 December 2024, 05:34:03 PM
Share
इचलकरंजी - चार दिवसापूर्वी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास शहापूर पोलीस करत होते. रेकॉर्ड वरील गुन्हेगार विनायक कुंभार आणि किरण पाटील हे दोघे शहापूर मधील म्हसोबा मंदीर इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.
चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याची माहिती दिलीय. त्यांच्याकडून सुमारे पावणे पाच लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. किरण पाटील याच्यावर सहा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर विनायक कुंभार वर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणी २४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावलीय