उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी

01 September 2024, 03:47:00 PM Share
कोल्हापूर -  गौरी - गणपती सणानिमित्त शासनानं  अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा  देण्याचं जाहीर केलंय. मात्र अन्न पुरवठा खात्यानं  राज्यातील सर्व जिल्ह्यांना ९० टक्के आनंदाचा शिधा मंजूर केलाय. उर्वरित 10 टक्के शिधा तातडीनं  द्यावा, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेनं केलीय. 

शिधा कमी आल्यास  दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यात वादावादीचे प्रसंग होत असतात. त्यामुळं   १०० टक्के आनंदाचा शिधा मिळावा अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेनं केलीयं. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतली.जिल्हयातील लाभार्थ्यांची संख्या विचारत घेता वाढीव शिधाची मागणी आपण शासनाकडं केल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित लेख