रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..!
11 April 2024, 06:20:21 PM
Share
कोल्हापूर - गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झालीय. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे.
या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला.