‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना
04 February 2024, 05:10:08 PM
Share
मुंबई – आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना खळखळून हसवणारे सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकर यांच्या मुलाची म्हणजेच अभिनेते नासिर खान यांना काम मिळत नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र समोर येत आहे. याबाबत अभिनेते नासिर खान यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात त्यांनी काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केलीय.
अभिनेते नासिर खान यांनी व्हिडीओमध्ये म्हटलय कि, “मला सगळ्या कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांच्या असिस्टंट्सना सांगायचं आहे की, मी अनेक अॅड फिल्म्स, टिव्ही, वेब सीरिज आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तुम्ही मला पाहिलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की मी योग्य अभिनेता आहे, तर कृपया मला कॉल किंवा मेसेज करा. मला तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचे आहे. मात्र, आता ऑडिशन देण्याची ताकद आणि हिंम्मत माझ्यात नाही”