लवकरच 'जवान - 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार : दिग्दर्शकांचा खुलासा
18 September 2023, 01:42:50 PM
Share
मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानच्या 'जवान' सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी खूप उत्सुकता दिसून येत आहे असे असताना सिनेमाचे दिग्दर्शक अॅटली कुमार यांनी एका मुलाखतीत 'जवान' सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केलय. त्यामुळे लवकरच चाहत्यांच्या भेटीला 'जवान - 2' सिनेमा येणार आहे.
एटली म्हणाला की ,"माझ्या कोणत्याही सिनेमाचा शेवट मी वेगळा करतो. आजपर्यंत मी अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून कोणत्याही सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा मी कधीही विचार केला नाही.'जवान' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही या सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा निर्णय घेत आहोत".