हद्दवाढीसाठी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय धरणं आंदोलन
16 March 2025, 04:43:58 PM
Share
कोल्हापूर - कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय धरणं आंदोलन करण्याचा निर्णय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं बैठकीत घेण्यात आला. कोल्हापुरातील सूर्या सभागृहात झालेल्या बैठकीस विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं सूर्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत अनेकांनी हद्दवाढ झालीच पाहिजे, हद्दवाढीसाठी भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं अशी मागणी केली.
बैठकीत बोलताना बाबा पार्टे यांनी, कोल्हापूरने दहा आमदार निवडूण दिले असून महायुतीनं चांगला निर्णय घेऊन कोल्हापूरला न्याय द्यावा अशी मागणी केली.
माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी, नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असून ही त्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नसल्याचं सांगितलं.
व्हि.बी. पाटील यांनी, गाव आणि शहर अशी ईर्षा न करता यामध्ये सुसंवाद होण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली.
अनिल घाटगे यांनी, हद्दवाढीचा लढा आणखी तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. प्रार्थना समर्थ यांनी, नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेण्यापेक्षा हद्दवाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. महादेवी भंडारी यांनी, आमदार त्यांचे सत्ताही त्यांची मग हद्दवाढ का होत नाही? असा सवाल केला. भूपाल शेटे यांनी, हद्दवाढ करा नाहीतर महानगरपालिकेला ग्रामपंचायत म्हणून जाहिर करा अशी मागणी केली.
जयंत पाटील, भरत काळे, विलास वासकर, सुनील देसाई, राजू जाधव, उत्तम पाटील, अनिल कदम, संजय शेटे, राजू शेंगाडे, सुजित चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केलं.
या बैठकीत सर्वांनी हात वर करत येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय धरणं आंदोलन करण्याचा निर्धार केला.
बैठकीस माजी महापौर आर.के.पोवार, रविकिरण इंगवले, अनिल लवेकर, महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तरे, फिरोज सरगूर, दिलीप देसाई, दुर्गेश लिंग्रस यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.