डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन
15 March 2025, 05:32:12 PM
Share
कोल्हापूर - डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचं योगदान महत्वपूर्ण असून नवीन विद्यार्थ्यांना, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’ अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष
चेडे यांनी व्यक्त केलाय. माजी विद्यार्थ्यांनी ६७ लाखांच्या निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल शाखेच्या नूतनीकरण केलेल्या नव्या विभागाचं आणि माजी विद्यार्थ्यांनी ६७ लाखांच्या निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चं उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब’साठी माजी विद्यार्थ्यांनी, संशोधनाकरिता आवश्यक असणाऱ्या केमिकल रिएक्टर, प्लेट टाइप हिट एक्सचेंजर, डिस्टीलेशन सेट अप आणि विविध प्रकारची पॅकिंग अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी पुण्याच्या केमस्पेप्ट इंजिनिअरिंगचे प्रकाश बंडगर, एच.एक्स. इंडियाचे अभय कुलकर्णी आणि प्रफुल्ल वायफळकर, केम ऑर्बिटचे किरण पाटील, नरेश हंचाते, रोहित अंतुलवार, प्रवीण आयवळे, साईसागर खोत, ऑक्सिकेमचे शुभम पाटील यांनी योगदान दिलय.
या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांनी, माजी विद्यार्थ्यांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण असून नव्या विद्यार्थ्यांना ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. माजी विद्यार्थी असलेल्या केमसेप्ट इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड चे प्रकाश बंडगर यांनी, "केमिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची महत्वपूर्ण शाखा असून केमिकल शाखेच्या अभियंत्यांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल आणि देदिप्यमान असल्याचं सांगितलं. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा ठरवून खडतर परिश्रम घेण्याची तयारी ठेवण्याचं त्यांनी आवाहन केलं . माजी विद्यार्थ्यांनी रिसर्च लॅब संशोधनासाठी सुसज्ज करण्याकरिता आवश्यक उपकरणे पुरविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, डॉ .ए.के. गुप्ता यांनी त्यांचं कौतुक केलय.
या कार्यक्रमा वेळी रजिस्ट्रार डॉ. एल व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. अमरसिंग जाधव, विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव, प्राध्यापक डॉ. राहुल महाजन, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुदर्शन सुतार, सह अधिष्ठाता प्रा.मनीषा भानुसे, प्रा. रविंद्र बेन्नी, टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.