पाटाकडील तालीम मंडळाने पटकावला 'सतेज चषक २०२५'
15 March 2025, 02:02:52 PM
Share
कोल्हापूर - पाटाकडील तालीम मंडळ 'सतेज चषक २०२५' चा मानकरी ठरलाय. पाटाकडील तालीम मंडळ आणि डी वाय पाटील ग्रुप आयोजित स्वर्गीय पांडबा जाधव व स्वर्गीय रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज छत्रपती शाहू स्टेडीयम वर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम संघादरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला. या संघा दरम्यानचा हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी समर्थकांसह फुटबाल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
सामन्याच्या सुरुवाती पासूनच पीटीएमच्या ओंकार मोरे, नबी खान, ऋषिकेश मेथे – पाटील, अर्शद अली यांनी वेगवान चढाया करून खंडोबा संघावर दबाव निर्माण केला. खंडोबाच्या नवीन रेघू ,रोहित जाधव यांनी केलेल्या खोलवर चढाया पीटीएम संघानं रोखल्या. मध्यंतराला दोन मिनिटं बाकी असताना पीटीएम च्या निवृत्ती पवनोजी यानं मैदानी गोल नोदवून संघाला १-० अशी आघाडी मिळऊन दिली. मध्यंतरापर्यंत हा सामना १ - ० असा राहिला. उत्तरार्धात पीटीएमच्या गोलची बरोबरी साधण्याच्या उद्देशानं खंडोबा संघ मैदानात उतरला .
पीटीएमच्या निवृती पवनोजी यानं मारलेला कॉर्नर फटका खंडोबाचा गोलरक्षकान रोखला. खंडोबाच्या गोल क्षेत्रात पीटीएमच्या चढाया रोखण्याचा खंडोबा कडून प्रयत्न सुरू असताना उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवत पीटीएमच्या ओंकार मोरे यानं चपळाईन गोल करून पीटीएमला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलची बरोबरी साधण्यासाठी खंडोबा कडूनही वेगवान चढाया करण्यात आल्या. खंडोबाच्या ऋतुराज संकपाळ यानं मैदानी गोल करून पीटीएमची एक गोलनं आघाडी कमी केली.
पीटीएमच्या पवनोजी च्या कॉर्नर पासवर आरबाज पेंढारी यानं संघासाठी तिसरा गोल केला. त्या पाठोपाठ खंडोबाच्या कुणाल दळवी यानं उत्कृष्ठ गोल करून सामना 3 - 2 अशा स्थितीत आणला. खंडोबाच्या गोल क्षेत्रात ऋषिकेश मेथे पाटील हा चढाई करत असताना खंडोबा कडून मेथे - पाटील याला धोकादायक रित्या रोखल्यानं पंचानी पीटीएमला पेनल्टी दिली. यावर मेथे पाटील यानं अचूक गोल नोंदवून संघाला 4 -2 अशी आघाडी मिळून दिली . सामना संपण्यास काही मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या खेळाडूंनी खंडोबाच्या खेळाडूला धोकादायक रित्या रोखल्यांन खंडोबाला पेनल्टी मिळाली. मात्र या पेनल्टीवर प्रभू पोवार याला गोल करता आला नाही. संपूर्ण वेळेत खंडोबा संघाला पीटीएमची बरोबरी साधता आली नसल्यान पीटीएमनं हा सामना 4 - 2 अशा गोलफरकानं जिंकून सतेज चषक पटकावला. या विजयानंतर पीटीएमच्या समर्थकांनी जल्लोष केला. या सामन्यात अजिंक्य गुजर, प्रदीप साळोखे, माणिक पाटील, गौरव माने यांनी पंच म्हणून तर विजय साळोखे यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं
आमदार जयंत आसगावकर, केएसए चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते विजेत्या पीटीएम संघाला 2 लाख रुपये आणि उपविजेता खंडोबा संघाला एक लाख रुपये आणि चषक देवून गौरवण्यात आलं. या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूनाही रोख बक्षीस देवून गौरवण्यात आलं. अंतिम सामन्यात पीटीएमचा नबी खान सामनावीर ठरला, तर मालिकावीरचा बहुमान पीटीएमच्या अरबाज पेंढारी यान पटकावला. बक्षिस वितरण प्रसंगी भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक मंदार ताम्हणे, शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, पीटीएमचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, स्पर्धा संयोजक संदीप सरनाईक, रियाज सुभेदार, रोहित पाटील, सुयोग मगदूम, भैय्या शेटके, ईश्वर परमार, प्रताप जाधव, संदीप देसाई, संजय संकपाळ,संजय मोहिते अर्जुन माने आदी उपस्थित होते.