त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील - राजू शेट्टी
14 March 2025, 03:14:21 PM
Share
जयसिंगपूर : जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शनिवार (दि.१५) रोजी सकाळी १० वाजता उदगाव येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली. येत्या सोमवार (दि. १७) व मंगळवार (दि. १८) रोजी रत्नागिरी नागपूर महामार्गातील बाधित गावातील उदगांव व उमळवाड येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेकायदीशीररित्या मोजणी करणार आहेत. त्यामुळे मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा. जे अधिकारी शेतात खुणा रोवतील त्या खुणा उपसून टाका, असाही शेतकऱ्यांना त्यांनी सल्ला दिलाय.
शिरोळ तालुक्यातील जैनापुर येथे रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून सकाळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन चौकशी केली.
त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले कि, हे आंदोलन फक्त बाधित शेतकऱ्यांचे नाही तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गातील कृष्णा नदीवरील होणा-या पुलामुळे उमळवाड, कोथळी, सांगली शहर, धामणी, समडोळी कवठेपिराण , सांगलवाडी , हरिपूर , दानोळी , कवठेसार , हिंगणगांव , कुंभोज दुधगांव सावळवाडी माळवाडी ,किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे. विक्रम पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक झाला आहे. विक्रम पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले असून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, कोथळीचे सरपंच अनमोल करे, जैनापुरच्या सरपंच संगीता कांबळे, ऋषभ पाटील, गौतम इंगळे, विजय खवाटे, भरतेश खवाटे, निळकंठ राजमाने, स्वस्तिक पाटील, दिग्विजय सूर्यवंशी , सुधाकर पाटील , शिवाजी कांबळे , यांच्यासह दहा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.