घिसाड गल्लीतील फटाका गोदाम असलेल्या इमारतीला आग. 50 लाखांचे नुकसान
14 March 2025, 02:49:08 PM
Share
कोल्हापूर - आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील घीसाड गल्लीतील संजय मूग यांच्या फटाका गोदामाला आणि या इमारतीत राहणाऱ्या पाच भाडोत्री कुटुंबांच्या प्रापंचिक साहित्याला आग लागली. या आगीत फटाके, रोख रक्कम आणि दागिने जळून सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 3 तास अथक परिश्रम घेवून ही आग आटोक्यात आणलीय.
कोल्हापुरातील फटाके व्यापारी संजय मूग यांचं लक्ष्मीपुरीतल्या घिसाड गल्लीतील देशभूषण हायस्कूल समोर असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फटाका गोदाम आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाच भाडेकरू राहतात. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुग यांच्या फटाका गोदामाला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीनं क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांनी मदत कार्य राबवत भाडेकरूंना सुखरूप बाहेर काढलं. या आगीची वर्दी मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र फटाके फुटून मोठमोठ्यानं आवाज येत असल्यानं आग विझवण्यात व्यत्यय येत होता. या आगीत मूग यांच्या गोदामातील लाखो रुपये किंमतीचे फटाके पूर्णत: जळून खाक झाले. तर मूग यांच्या इमारतीत राहणारे भाडेकरू दस्तगीर मोमीन, अन्सार मुल्लानी, जमीर पन्हाळकर, गणेश काळे,आणि सुदेश चौगले यांच्या घरातील रोख रक्कम दागिने, महत्वाची कागदपत्रे आणि प्रापंचिक साहित्य असं सुमारे 50 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. अरुंद इमारत आणि पहाटेच्या वेळी असलेल्या अंधारामुळं ही आग विझवण्यासाठी जवळपास 3 तास लागले. ही आग विझवण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, हायर ऑफिसर कांता बांदेकर, दस्तगीर मुल्ला, योगेश जाधव, अमोल पाटील, रघुनाथ साठे, चंद्रकांत पाटील, रमजान पटेल, अजित शिनगारे, पुंडलिक माने, रमेश टिपुगडे, सुशांत जोंधळे, पवन कांबळे, निवास जाधव, गिरीश गवळी, युवराज पाटील, सुभाष मगदूम, सुरेश पाटील या जवानानी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तब्बल 3 तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.दरम्यान आज सकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, मंगेश माने यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा करत घटनेची माहिती घेतली.