संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीने तीन लाखांहून अधिक शेणी केल्या दान

16 March 2025, 05:28:02 PM Share
कोल्हापुरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मागील नऊ वर्षांपासून शेणी दान उपक्रम राबिवला जातो. या उपक्रमाअंतर्गत  नागरिकांकडून जमा झालेल्या शेणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस दान केल्या जातात. आज महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेणी दान कार्यक्रम झाला. यावर्षी सव्वा तीन लाखांहून अधिक शेणी महानगरपालिकेला दान करण्यात आल्या. यावेळी शेणीदान उपक्रमाचं  महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी कौतुक केलं. 

नऊ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून , आतापर्यंत २१ लाख शेणी दान केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं शारंगधर देशमुख यांनी सांगितलं. 

याप्रसंगी घेतलेल्या रक्तदान शिबीरात १५७ दात्यांनी रक्तदान केलं यावेळी  राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे,मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील, सचिन पाटील, अभिजीत चव्हाण, संजय सांवत, कुलदीप सारवतकर, चेतन भोंगाळे, जयदीप पाटील, आनंद पाटणकर, ऊन्मेश जेरे, अभिजीत खतकर, सुयोग मगदुम, प्रमिला देशमुख, प्राची मंडलिक, पल्लवी बोळाईकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

संबंधित लेख