पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकी स्वाराला लुटलं...
16 March 2025, 04:54:04 PM
Share
कोल्हापूर - उंचगाव मणेर मळा परिसरात राहणारे निलेश कोंडीबा सावंत हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. सावंत हे दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा शाहूपुरी व्यापारी पेठेतून घरी जात होते.त्यावेळी एकानं पोलीस असल्याची बतावणी करून सावंत यांना अडवून रात्री उशिरा फिरत असल्याच्या कारणावरून 600 रुपये दंड घेतला.
यानंतर तोतया पोलिसाने सावंत यांच्या पत्नीला फोनवरून धमकी देत सावंत यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल संच हिसकावून घेतला होता. याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील आवळी इथल्या महेश पाटील या संशयितला अटक केलीय.त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय.पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर अधिक तपास करतायत.