अचानक छातीत दुखू लागल्याने संगीतकार ए.आर. रहमान रुग्णालयात दाखल
16 March 2025, 11:51:20 AM
Share
मुंबई – अचानक छातीत दुखू लागल्याने संगीतकार ए.आर. रहमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ए आर रहमान यांना दुपारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. पण, अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.