बौद्धगया मधील महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरात आंदोलन

12 March 2025, 05:58:53 PM Share
कोल्हापूर - बौद्धगया मधील महाविहार ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यातुन मुक्त करुन बौद्धांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, भिक्खु संघ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बुध्द अनुयायांनी आज, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं.

सम्राट अशोक यांनी तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं. तथागत गौतम बुध्दांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळं देशातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी, भिक्खु  आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात. मात्र या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.

 महाबोधी विहार बोद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी १९९२ पासून आंदोलनं होतायत, मात्र महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आलेला नाही. ज्या रुढी परंपरांना तथागत गौतम बुद्धांनी नाकारलं तीच कर्मकांड इथं सुरु असतात. त्यामुळं, बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी जोर धरु लागलीय. धरणं आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

संबंधित लेख