अभिनेता सोनू सूदला अटक करण्याचे वारंट जारी

07 February 2025, 12:51:35 PM Share
मुंबई - अभिनेता सोनू सूदला  अटक करण्याचे वारंट पंजाबच्या लुधियाना कोर्टाने काढला आहे. 10 लाखांच्या  फसवणुक प्रकरणी  न्यायालयानं वारंवार समन्स पाठवूनही अभिनेता सोनू सूद साक्ष देण्यासाठी हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने अभिनेत्याला अटक करून हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंजाब कोर्टाने हे वॉरंट मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा पोलीस ठाण्याकडे पाठवले आहे. यात सोनूला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अभिनेता सोनू सूदला अटक होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख