इजतेमाबाबत सोशल मीडियातून खोटे आरोप करणाऱ्या संघटनांवर कारवाईची मागणी

05 February 2025, 06:01:28 PM Share
कोल्हापूर - दरवर्षी जिल्हास्तरावर इजतेमाचं आयोजन करण्यात येत असतं. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे इजतेमा संपन्न होतात. मुस्लिम समाजाचा हा धार्मिक कार्यक्रम असून या निमित्तानं मुस्लिम समाजबांधव एकत्र येऊन सामुदायिक नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात. इजतेमाचं आयोजन, चार भिंतीच्या आत न करता खुल्या जागेवर केलं जातं, अशा कार्यक्रमाला पोलिसांचाही बंदोबस्त असतो. राज्य गुप्तवार्ता विभाग, केंद्रीय विभागाचे गुप्तवार्ता विभाग, त्यांचे अधिकारी, अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवून त्याचा अहवालही शासनापर्यंत देत असतात. यामध्ये कोणतेही गैरप्रकार नसताना मुस्लिम समाजाच्या अशा धार्मिक कार्यक्रमांवर काही संघटना जाणीवपूर्वक सोशल मीडिया द्वारे खोटे आरोप करतायत, असा आरोप मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीनं केलाय.

 मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीनं केलीय. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. 
यावेळी इमरान सनदी, इरफान बिजली, इलियास कुन्भुरे, फजल मुजावर, जुबेर पठाण, आसिफ शेख, मोहसीन शेख यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख