वारणानगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘आयडिया लॅब’ची मान्यता
04 February 2025, 05:04:47 PM
Share
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून आयडिया लॅबची मान्यता मिळाली असल्याची माहिती वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून आयडिया लॅबची मान्यता मिळालीय. आत्मनिर्भर भारत, स्कील इंडिया, मेक इन इंडिया या मिशनला चालना देण्यासाठी तंत्रपरिषदेनं योजना सुरू केलीय. आयडिया लॅब प्रयोगशाळेमुळं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नावीन्यपुर्ण स्कीलिंग संशोधन, उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकास आणि स्टार्टअप संकल्पनांवर कार्य करण्याची संधी मिळणार असून, या लॅबसाठी सुमारे दोन कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची उभारणी येत्या चार महिन्यांत होणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं.
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास आयडिया लॅबची मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार कोरे यांचा सत्कार वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी केला. यावेळी लॅबचे समन्वयक अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, डॉ. यू. बी. देशन्नवर, जालिंदर जाधव, प्रा. गणेश कांबळे आदी उपस्थित होते.