अजित पवारांना काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात...: मनोज जरांगेंचा संशय
04 February 2025, 02:01:05 PM
Share
बीड - मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी,” अजित पवारांना काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात”, असा संशय व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले कि, संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे पुरावे नष्ट करत असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. तसेच अजित पवारांना देखील काही गोष्टी माहिती असून ते धनंजय मुंडेंची पाठराखण करतात, असा आम्हाला संशय आहे. धनंजय मुंडे आरोपी फरार करायला फिरत आहे. बाहेरचे आणि आतले आरोपी सांभाळत आहेत. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वत: काम करत आहेत असा दावा त्यांनी केला आहे.