...मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील

03 February 2025, 01:57:52 PM Share
सांगली - काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेल्या मोठा गोंधळामुळे शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. यावर आज राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. या स्पर्धेवर सांगलीचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी, पंचाचा निर्णय वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले की, पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.

संबंधित लेख