निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात...
02 February 2025, 06:10:09 PM
Share
कोल्हापूर - उजळाईवाडीतील पसरिचा नगरमध्ये महावीर सकळे हे निवृत्त पोलीस अधिकारी राहतात. शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरातून आत्मसंरक्षणासाठी घेतलेली रिव्हॉल्व्हर चोरीला गेली होती. शनिवारी सकाळी ही बाब सकळे यांच्या निदर्शनास आली. सकळे यांनी या प्रकरणी शनिवारी अज्ञाताविरोधात गोकुळ शिरगाव पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच रिव्हॉल्व्हर चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून चोरीची रिव्हॉल्व्हर जप्त केलीय.