भविष्यात बहुजनांचे शिक्षण संपुष्टात येण्याचा धोका : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे

02 February 2025, 05:33:51 PM Share
कोल्हापूर – देशात शिक्षणाचं भगवेकरण करणं सुरू असून केंद्रातील सरकार मनुस्मृतीचं समर्थन करणार असल्यानं भविष्यात बहुजनांच शिक्षण संपुष्टात येण्याचा धोका असल्याची भीती ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड आनंद मेणसे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं कोल्हापूर अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचं ७वं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात आयोजित करण्यात आलंय. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 यावेळी  आमदार प्रविण सावंत, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, कॉम्रेड बाबूलाल झा, कॉम्रेड दिलीप पवार, अनिल लवेकर, भरत रसाळे, एस डी लाड , विश्वनाथ मिरजकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी  विविध १३ ठराव करण्यात आले.

संबंधित लेख