खा. राहुल गांधींवरील ‘या’ याचिकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती...
20 January 2025, 01:43:51 PM
Share
नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. या विरोधात भाजपचे कार्यकर्ते नवीन झा यांनी कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे त्यामुळे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालाय.
न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता खंडपीठाने झारखंड सरकार आणि भाजप नेत्यांना नोटीस बजावली असून या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाच्या कामकाजाला स्थगिती दिली आहे.