‘तुम्ही म्हणाल तर, स्वबळावर निवडणुका लढवू’ : खा. अशोक चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

20 January 2025, 12:52:42 PM Share
नांदेड – “तुम्ही म्हणाल तर स्वबळावर निवडणुका लढवू” असे सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत केले आहे. ते नांदेडमध्ये आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलत होते.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले कि, “आपली ताकद निश्चितच अधिक आहे. प्रमुख राज्यात आपल्या पक्षाचे नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे आहेत. शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे. सर्वाधिक आमदार आपले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आपला आहे. आगामी काळात परिस्थिती जी काही निर्माण होईल, त्यानुसार युद्धाला तयार राहिलं पाहिजे. युती आहे तर जागा सोडून द्याल, तर असं काही ठरलेलं नाही. तुम्ही जर म्हणालात तर स्वबळावर आम्ही निवडणुका लढवू शकतो. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं मत आपण आपल्या वरिष्ठांना कळवू. आपल्याला जिथे पोषक वातावारण आहे, त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत.”

संबंधित लेख