पोलिसांच्या भोंगळ कारभारामुळं हत्या झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची हेळसांड...नातेवाईकांचा संताप
19 January 2025, 04:36:38 PM
Share
इचलकरंजी - इचलकरंजीत दोन दिवसापूर्वी मित्रांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी विशाल लोकरे याला उसाच्या ट्रॅक्टर ट्रॅलीखाली ढकलून त्याचा खून करण्यात आला होता. विशाल याचं पार्थिव शनिवारी सकाळी घरात आणण्यात आलं. त्यानंतर अंत्यविधी पूर्वीचे सर्व सोपस्कर करुन मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यात येत होता. परंतु मयत विशाल याच्या रक्ताचे नमुनेच तपासणीसाठी घेण्यात आले नसल्यानं गावभाग पोलिसांनी रस्त्यातच शववाहिका अडवून मृतदेह पुन्हा इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. परंतु त्या रुग्णालय प्रशासनाकडून ज्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचठिकाणी नमुने घ्यायला सांगितलं.
त्यामुळं विशालचा मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेतून आहे. त्या अवस्थेत सांगली सिव्हील रुग्णालयात नेण्यात आला. पण विशाल याच्या अंत्यविधी साठी आलेले काही नातेवाईक काही रुग्णालयात, काही पंचगंगा नदी घाटावर तर काही त्याच्या घरी थांबले होते. पोलिसांच्या या कारभाराचा नातेवाईकांना नाहक त्रास झाला. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं नातेवाईकांनी सांगितलय.