जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाटगेला पानिपत शौर्य कन्या पुरस्कार प्रदान
19 January 2025, 02:30:31 PM
Share
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत संघटनेच्या वतीने हरियाणात मराठा शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाटगे हिला पानिपत शौर्य कन्या पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, स्वामी स्वरूपानंद स्वामी, UPSC आयोगाचे सदस्य अजित भोसले, थोर इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, मराठा मंचाचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील, माजी आमदार मराठा रणधीर गोलन, सुरजित कल्याण, बसताडा गावाचे सरपंच सुरेश मराठा, डॉ.ओमप्रकाश यांची प्रमुख उपस्थित होती.
आतापर्यंत अन्वीने गिर्यारोहन क्षेत्रामध्ये तब्बल पाच वर्ल्ड रेकॉर्ड,सहा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड स्वता: च्या नावावर केले आहे. पानिपत शौर्य कन्या पुरस्कार हा तिला मिळालेला २४८ वा पुरस्कार आहे.
यावेळी इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांना "रोडमराठा रत्न"या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी हरियाणा राज्यातील तसेच महाराष्ट्रातील पुणे, नाशीक, मुंबई, ठाणे, गोवा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, जळगांव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, अकोला, लातूर, अहिल्या नगर, छ. संभाजी नगर या जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.