‘आता तुम्ही राजीनामा...’: अंजली दमानियांचा मंत्री धनंजय मुंडेंना इशारा
19 January 2025, 02:23:41 PM
Share
मुंबई – शिर्डीत अजित पवार गटाचं ‘नवसंकल्प शिबिर’ पार पडत आहे. यावेळी ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी, बीड प्रकरणावरून पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, ‘तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड बद्दल काय म्हणाली वाचा’ असे म्हणत ‘आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा’ असा इशारा दिला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या कि, ‘धनंजय मुंडे, बीड च्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराड नी केली, सुदर्शन घुले नी केली, विष्णू चाटे नी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊ द्या बोलवत नाही’