केआयटीच्या अध्यक्षपदी साजिद हुदली तर उपाध्यक्षपदी सचिन मेनन यांची निवड
01 August 2024, 01:29:44 PM
Share
कोल्हापूर - केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि केआयटी आयएमईआर यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०२४ ते २०२७ या काळासाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून साजिद हुदली, उपाध्यक्ष म्हणून सचिन मेनन तर सचिव म्हणून दीपक चौगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय. केआयटी आयएमईआर च्या संचालक विश्वस्तपदी सुनील कुलकर्णी यांची निवड करण्यात आलीय. यावेळी संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.
यावेळी सर्व संचालकांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष साजिद हुदली यांनी, आगामी काळात केआयटी संशोधनाचे केंद्र बनेल तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवेल याबाबत सर्व संचालक मंडळाला आश्वस्त केलं.