‘माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच’ : आ. अमोल मिटकरींचा आरोप
31 July 2024, 02:17:08 PM
Share
अकोला : “माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा” गंभीर आरोप आ. अमोल मिटकरी यांनी केलाय. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलिसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसे सैनिक फरार राहू शकत नाही, असं म्हणत आ. मिटकरी यांनी, या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय.
आ. अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील तीन आरोपींना अटक करण्यात आलंय.