पूर्ण क्षमतेने भरण्याकडे राधानगरी धरणाची वाटचाल
24 July 2024, 12:41:34 PM
Share
कोल्हापूर – वाढत्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आलाय. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीयत. आज सकाळी राधानगरी धरण 92. 08 टक्के भरल्याची नोंद झालीय. धरण क्षेत्रातील वाढत्या पावसामुळे राधानगरी धरणाची वाटचाल १०० टक्के भरण्याकडे सुरु झालीय. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने सर्तक राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातय.