कोल्हापूरच्या सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

19 July 2024, 05:10:48 PM Share
कोल्हापूर – छत्तीसगडमधील  राजनंदगाव येथे पार पडणाऱ्या  दुसऱ्या महिला व पुरुष ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झालीय. हॉकी इंडियाच्यावतीने  सिद्धीची ही निवड झालीय. 
ही  स्पर्धा दिनांक 21 जुलै ते 28 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. तिला  हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, मनीष आनंद, मनोज भोरे व हॉकी कोल्हापूरचे  अध्यक्ष सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले आणि  हॉकी कोल्हापूरचे सर्व सदस्य यांचे  मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख