निधी मिळत नसल्याने शिंदे गटाचे आमदार आक्रमक...भर बैठकीत फाडला कागद

19 July 2024, 01:04:03 PM Share
मुंबई – विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचं म्हणत मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक झालेत. यावेळी आक्रमक झालेल्या  आ. लांडेंनी निधी फक्त कागदावरच म्हणत भर बैठकीत कागद फाडून आपला राग व्यक्त केलाय. यावेळी आ. लांडेंपाठोपाठ आ. नवाब मलिकही बैठकीतून बाहेर पडल्याचं समोर आलंय.या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित असताना हा सर्व प्रकार घडलाय.

संबंधित लेख