स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधील ओबीसी आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख...
नवी दिल्ली – सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानुसार उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे, असं असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ओबीसी आरक्षणासंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे. त्यात कोर्टाकडून या याचिकेला तारीख पे तारीख मिळत आहे.
आज सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंबंधी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हेंबर) ठेवली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.